नवी वाटचाल २०११

वार्धक्य घेऊन निघाले जीवन जगण्यासाठी.
सिद्ध अनुभवांची रत्ने लेवूनी अंगावरती .
समृद्ध शांत मनात पहिले प्रतिबिंब .
सुखावले पण  जहाले उदासीन, श्रांत .
 
प्रौढ-तरुण सगळे मिसळून गेले .
धावत होते काही लपवून वार्धक्याला.
बाल गोपाल मज कुठेच नही दिसले.
खळाळणारे हास्य भेसूर भासले .
अंगडी टोपडी परकर पोलक्यात दिसली मोठीच मंडळी .
शरीरानं लहान जरी शाब्दिक विद्वत्तेने भारलेली .
काव्य ओव्या कथांचे भानच नव्हते कुणाला .
सप्तसुर सप्तरंग कळकटून विटलेले .
भेसूर संगीताला मंद वारा साथ देत नव्हता .
हृदय फ़ाडून टाकणारे शब्द नृत्य चाले बेगडी बीभत्स .
पावले थकली तिथवर चलले दगडावर टेकून शांत बसले