पुनवेस सूर्य नाही अवसेस उभय नाही
का पोरके न वाटे उरल्या दिशांस दाही ?
पाण्यास रंग नाही मिसळून अंग पाही
तळ साकळे मळांनी पृष्ठास नभनिळाई ?
एकांत माणसाचा तो ही असाच स्थाई
असुनी सवे प्रवासी तो एकटा प्रवाही
सल नित्य भावनांचे माझे कुणा म्हणू मी ?
सारेच विश्व माझे नाही कुणा म्हणू मी ?
............ चारवा