लोचन

कविताः " लोचन "
पाहून तुझे आर्त लोचन,मज मिळे जगण्याचे कारण गं..
किती पाहू तयात रोखून, मज माझे स्मरण कुठे उरले गं?
किती पाहावे? की पाहत राहावे? माझे भानच हरपून गेले गं..
उरात उरते विश्व तुझिया नयनांचे, माझे विश्वच तयात हरवले गं..
पापण्यांशी किती खेळावे? ती मिटताच मनात दिवस मावळले गं..
काजळ घाली तू तयात, इथे हृदयावर गडद आठवण उमटते गं..
भुवई नाचती ऋतूंवरती, मज तयात इंद्रधनू दिसले गं..
इंद्रधनूत सात रंग अलिप्त, पण ते सर्व इथे एकरंग मिसळले गं..
पापण्याच्या केसांनी तर, मज ईच्हापूर्तीचे वचन दिले गं..
-- श्रीनिवास गुजर