तुझ्या जाण्यानंतर ....

तुझ्या जाण्यानंतर


हा दुरावा छ्ळतो आता,


तुझ्याविना जीवनाचा


अर्थ कळतो आता.


     आभाळ सारे मोकळे


     मेघ नाही कुठे आता,


     माझ्या मनाच्या पालवीचा


     पाऊस होतीस तु.


         तु होतीस माझी,का स्वप्न माझे


         कहाणी अर्धी उरते आता,


         तुझ्या जाण्यानंतर तुझी


         आठ्वण छळते आता.......