अपघात

एक झाड होते उभे
कडेस रस्त्याच्या
अपघात झाला मोठा 
पायाशीच त्याच्या...

झाली दोन वाहनांची
जोराची टक्कर
सारी माणसे त्यांतली
जिवानिशी ठार...

जरी अपघातस्थळी 
कोणी बघाया नव्हते
काय घडले यावर
दिली पुष्कळांनी मते...

'दोष होता झाडाचा ' 
हे एकमत झाले
आणि लगेचच सारे 
झाड तोडायला आले...