फोटो

आज अचानक तुझा फोटो दीसला;

आणि नको असलेलं बरंच काही दाटून आलं;
आपल्या दोघांमधलं दोघांनाच माहीत असलेलं;
तुझ्या डॉळ्यात मी माझ्या मनाप्रमाने वाचलेलं.
साऱ्या वावटळीत मी जपलं होतं;
तुझं माझ्यापुरता माझा असणं;
आणि या फोटोनेच जमलं  होतं;
माझा भुतकाळ तुझ्याशी जोडणं.
आता त्या आठवांनाही शाप आहे;
त्यांना कधीही न आठवण्याच्या;
आणि विसरलेलं बरच काही;
मनाच्या कप्प्यात सलण्याचा.
तुझा फोटोही तोच शाप मला सतत देतोय;
फसलेलं माझं जगणं मला परत दाखवतोय;
पण मला रागावताही येत नाही त्याच्यावर;
कारण तोच तर मला तुझ्याशिवाय जगायला शिकवतोय.
पण हारून जाते रे मी तोच तोचपणा जगताना;
तू नाहीस माझा हे माझ्या आयुष्यात बिंबवताना;
पण नाही जमत मला हे करायला;
आणि अवघड करतोय हा फोटो मला तुला विसरायला.