


बाजारात उपलब्ध असणार्या आधुनिक एकत्रित ध्वनी पद्धती उपकरणात (कॉम्बो म्युझिक सिस्टिम) फीत (टेप) चालक, ध्वनी / चित्र तबकडी चालक, प्राथमिक संवर्धक, संतुलक आणि शक्ती संवर्धक हे सगळे एका डब्यात कोंबलेले असतात. ह्याचा फायदा असा की जुळणी तारांना योग्य जुळणी करण्याचा त्रास कमी झाला, परंतु एक तोटा असा आहे की, एखाद्या भागात बिघाड झाल्यास पूर्ण एकत्रित उपकरण दुरुस्तीला देणे आवश्यक असते. संतुलक बंदिश (इक्वलाईझर सर्किट) - आधुनिक एकत्रित ध्वनी पद्धती उपकरण (कॉम्बो म्युझिक सिस्टिम) घरातील चार भिंतीत वापरताना, घरातील सामान, पडदे, व भिंती ह्या सगळ्याचा परिणाम ध्वनी लहरीवर होतो व त्यामुळे एखादा कार्यक्रम ऐकताना काही तरी वेगळेच ऐकावे लागते. मूळ कार्यक्रमाचा आनंद मिळवण्या करता ध्वनी लहरींच्या आवाजाची पातळीत कमी / जास्त करणे आवश्यक असते, ते ह्या संतुलक (इक्वलाईझर) बंदिशीने साध्य होते. आधुनिक उपकरणात विविध प्रकाराच्या संतुलनाची निवड करण्याची सोय असते.
संगीत आणि वाद्यवृंदाचे कार्यक्रम सभागृहात अथवा उघड्या मैदानावर असल्यास त्या कार्यक्रमाचा ध्वनी दर्जा (ऑडिओ क्वालिटी) योग्य सांभाळण्या करता विविध उपकरणांची आवश्यकता असते. प्रथम मर्यादा संच (लिमिटर). > मिश्रण संच (मिक्सर). > संतुलक संच (इक्वलाईझर). > विभागणी संच (स्प्लिटर). > आवश्यकते नुसार शक्ती संवर्धक संख्या > आवश्यकते नुसार तार - मध्यम - खर्ज सप्तकाचे ध्वनी प्रक्षेपक अशी जोडणी केलेली असते.
प्रत्येक ध्वनी परिवर्तकाच्या आवाजाची पातळी वाजवी पेक्षा जास्त वाढू नये म्हणून मर्यादा संच (लिमिटर) वापरतात. विभागणी बंदिश (स्प्लिटर सर्किट) - प्राथमिक संवर्धक > संतुलक ह्या जोडणीतून प्रक्रिया झाल्यावर ध्वनी लहरी संचातील खर्ज, मध्यम व तार सप्तकांचे तीन वेगळे भाग ह्या बंदिशीने घडतात. तीन भागात विभागणी झालेल्या ध्वनी लहरी चार वेगळ्या ध्वनी शक्ती संवर्धकाला जोडलेल्या असतात.
प्रथम मुख्य गायक/गायिका किंवा वादकाची ध्वनी पातळी मर्यादा संच (लिमिटर) निश्चित केली जाते. त्या नंतर ध्वनी परिवर्तकाची मर्यादा ठरवली जाते. आवाजाची व वाद्याची सुमधुरता संतुलक संच (इक्वलाईझर) बदल करून ठरवली जाते. नंतर शक्ती वर्धकाची पातळी निश्चित होते.
***** व्हिडीओ कॅमेरा, डिजीटल फोटो कॅमेरा, मायक्रोफोन, वगैरे उपकरणांची माहिती करता हा दुवा *****