डोळे मिटून का घेशी

डोळे मिटून का घेशी

का हा उर भरलेला

आज डोळ्यात तुझिया

आहे पाउस दाटला .

हात लांबवला जेव्हा

थेंबाना तु झेलावया

तृष्णा तुझिया मनाची

कळे माझिया मनाला.

तुझ्या चेहेऱ्याने जेव्हा

वारा पिउन घेतला

वारा तुझ्या मनातला

माझ्या मनात वाहला .

देह ओलाचिंब झाला

आला आषाढ भराला

तुझ्या आसवांसमोर

आज थिटा तोही झाला .