ध्रुवः कारण मला कधीच कंटाळा येत नाही
कारण मी ऑफिस मध्ये जांभया देत बसत नाही. वेळ पडल्यास चार केळी खातो पण डबा खाण्यात वेळ घालवत नाही. कारण मला कधीच कंटाळा येत नाही
काम केल्यावाचून एक दिवस ही गेला नाही, असे कधी होत नाही. माझा साहेब हमरातुमरी वर येत नाही. कारण मला कधीच कंटाळा येत नाही
आहे माझा पण एक मित्र सदाशिव पेठी, लावत असतो सतत बिडी ला काडी , त्याला पण कंपनी द्यायला मी कधी चुकत नाही. कारण मला कधीच कंटाळा येत नाही
माझ्या पण अवती भोवती चालत असतात सचिन आणि विक्रमी विचारांची वादळे , आम्ही त्यांच्या हो ला पण कधी, नाही म्हणत नाही. कारण मला कधीच कंटाळा येत नाही
मला पण जातात बरेच लोक वाकडे, पण त्यांना सरळ करायला आहे एक मित्र काकडे. त्याच्या वेडेपणात सुद्धा आम्ही कधी शहाणपणा करत नाही. कारण मला कधीच कंटाळा येत नाही