फक्त तुझ्यासाठी जगतोय...

तुझ्याशी जमलेली गट्टी ... मस्त अनुभवतोय
कधी नव्हे ते आज मनसोक्त जगतोय.

कधी पाहतोय वाट तुझ्या आवाजाची
कधी तुझ्या डोळ्यांनीच हे जग बघतोय...

निरागस तू,  तुझ्या निरागस नजरा...
आणि मी मात्र हतबल पुन्हा एकवटतोय...

आठवते भेट तुझी... संध्याकाळची...
कालसारखाच आज उनाड  भटकतोय...

तू छान, मस्त, हवीहवीशी...
कधीतरी तुलाही जाणवेल मी फक्त तुझ्यासाठी जगतोय....

..................... प्रविण रोहणकर