दोन पेग भर.....

काम संपले, करूया मस्ती, दोन पेग भर

अता जराशी, यावी सुस्ती, दोन पेग भर
नकोस सांडू, तिला जराही, लक्ष असू दे
जॉनी वॉकर, नाही सस्ती, दोन पेग भर
खबर लागली, कशी कुणाला, समजत नाही
सभोवती वाढल्यात गस्ती, दोन पेग भर
बोलायाचे ते बोलू दे, या लोकांना
करू देत निंदानालस्ती, दोन पेग भर
दोन घोट घे, क्षणात दिसतिल, असंख्य तारे
देइल दर्शन, सूर्य गभस्ती, दोन पेग भर
दुःख समस्या, विसरून जाऊ, क्षणात इथल्या
आज करूया, ढगात वस्ती, दोन पेग भर
प्रसंग हा कोणता, तुझे हे, काय चालले?
पुरे अता बोलणे 'अगस्ती', दोन पेग भर...
---- अगस्ती