पाहिलं सहज मागे वळून..
थकलेली वाट होती
तिथेच आपल्या पावलांची
पडलेली गाठ होती
काळ असा निघून गेला
सारं कसं अजून स्मरतं
निघून गेलेल्या गोष्टींचं
महत्त्व का नंतर कळतं
अर्धामध्ये खेळ संपला
खूप काही राहून गेलं
स्वप्न सारं माझं कसं
धुक्यामध्ये विरून गेलं
रोजच्या सारखे आज पुन्हा
भास मला गेले छळून
तू तिथच असशील म्हणून
पाहिलं सहज मागे वळून..
पाहिलं सहज मागे वळून..
- अनिरुद्ध अभ्यंकर