नव्हते मनांत तरीही, कसे अघटित घडले
त्या चित्त चोरट्याला, आपले म्हणून बसले
होते पुढे शिकायचे, आईचे ऐकून बसले
वधू परीक्षेस का मी, सजून बसले?
त्या हसऱ्या छबीत, मीच हरवून बसले.
त्या एका कटाक्षाने, घायाळ होऊन गेले..
बोलणे असे आर्जवी, का मनास गुंतवावे.?.
ठेवले जे सांभाळून, का वाटे उधळावे?
असेल मी आवडली?, कितीदा मना पुसावे
येईल का होकार?, म्हणुनी किती झुरावे
येता होकार त्यांचा, मन पाखरू व्हावे.
वाटे हे जीवन, त्या चरणी अर्पावे..
नव्हते मनात माझ्या, मग का असे घडावे?
या गारुडास सांगा, काय नाव द्यावे?
अविनाश