नाजूक नाजूक धवल अशी
अन हिरवी हिरवी तृनपती
पेरा पेरांतुनी डोकावती
फुलून गोड ती हसती
मंद मंद सुगंध वाहती
फुलदाणी अन मालांतून सजती
श्वासामध्ये गंध भरती
मन उल्हसित ती करती
संध्या सरता कळ्या उमलती
कवितेसाठी मज स्पूर्ती देती
मनात माझ्या मोर नाचती
गंधाने ते धुंध होती
निशिगंधा तू सुंदर किती
निशिगंधा तू सुंदर किती
प्राची कर्वे