बदला

सांग आहेस कोण तू, कुठला?
जाणतो मी खरे, न तू इथला...

सर्व ही लेकरे तुझीच तरी
आप-परभाव त्यांत हा कसला?
सुफल झाले अनेक स्वार्थ इथे
मात्र उरली न ही धरा सुजला...
राहिले कोण भोगण्यास सजा?
चालला दीर्धकाळ तो खटला!
काळ नेलास दूर दूर पुढे
जीवना घेतलास का बदला?
- कुमार