घेतले नाही कुणीही नांव माझे
आठवेना का मलाही नांव माझे?
दुःख आणि भोग माझे तेच सारे
द्रौपदी, सीता नसुनी नांव माझे..
शोधणे सोपेच आहे तु मला
कोरले थडग्यावरी मी नांव माझे ..
सभ्य तो, अपशब्द सारे टाळतो
घेत नाही तो 'म्हणुनी' नांव माझे..
ठेव आता खड्ग ते, दमलास तू
मी न उरले, संपलेही नांव माझे ..