हात सखीचा असा धरुनी मी
कधी जाईल उद्यानात
कधी कटीवर हात ठेवूनी
प्रियेस नेईल चित्रपटास.
वाहनात बसवूनी सुंदरा गरगरा
मिरवीन गर्वाने तिजला
हर्षाने करीन खर्च असा हा
जावो खिसा कितीही कापला
प्रेमाने भरवीन घास तिला मी
नेवूनी विदेशी उपहारगृही
अन तिथेच घालेन तिला मागणी
कधी येशील रमणी सांग स्वगृही
हि आळवणी आहे तुम्हास बाबा
नसे वचन प्रेमिकेस,
उपवर झाला तुमचा मुलगा
केवळ आणून देण्या हे लक्षात.