तिरडी वर शांत झोपून मी,
एकदा तुझ्या घरासमोरून जाइन...
तुझ्या
नेहमीच्या सवयी प्रमाने तु
उरातलं दू:ख दाबुन
तुझं जड झालेले
अंत:करण...
मला न दाखवता,
खोटं हास्य चेहऱ्यावर आणत...
आणि छानसा
अभीनय करत...
मला खिडकीतुनच निरोप देशील.
पण....?
पण लक्षात ठेव
...!
अश्रुंच्या बाबतीत तुझा हा
सर्व अभीनय फोल ठरेल..!
इवलीशी
डोळ्यांची जागा
त्यांना ही कमी पडेल...1
मग...?
मग.... एक एक अश्रु
...
मग.... एक एक अश्रु...
तुझ्या गालांवरून घरंगळेल...
विरह या
शब्दाचा खरा अर्थ तुला
तेव्हा तर नक्कीच कळेल
तेव्हा तर नक्कीच कळेल
...!!!
कवी -
नितिन म जाधव
मुल्हेर ता. बागलाण (नाशिक)