उऊऊऊऊउंच माझा झोका

कालच्या रविवारी एका चित्रवाणी कार्यक्रमात उंच माझा झोका हा कार्यक्रम चालू होता तेव्हा एक बातमी अचानक आठवली. ‘पीटर ड्रकर चॅलेन्ज’ नावाची एक दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरणारी निबंधस्पर्धा २०१५ या वर्षासाठी नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत दरवर्षी जागतिक स्तरावरून निबंध सादर केले जातात. या वर्षी ही स्पर्धा मुंबईच्या कु. नमिता नारकर या मराठी मुलीने प्रथम क्रमांक मिळवून जिंकलेली आहे. स्पर्धेचा विषयय होता ‘ह्यूमन डिफरन्सेस’. नोव्हेंबरमध्ये व्हिएन्ना येथे पारितोषिक वितरण समारंभ आहे.

दोनचार वर्षापूर्वीच तिने जैव-औषध यांत्रिकी (बायो मेडिकल) अभियांत्रिकी हा विषय घेऊन बीई ही पदवी मुंबई विश्वविद्यालयातून घेतांना विद्यापीठात सातवा क्रमांक मिळवला होता. तेव्हाच खरे तर तिच्या असामान्य प्रज्ञेची चुणूक पाहायला मिळाली होती. त्यानंतर तिने फिलीपाईन्समधून व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेतली. सध्या ती एका अत्याधुनिक हृदयशल्यसाधने बनवणार्‍या जपानी कंपनीत उच्च हुद्द्यावर काम करते.

या झळझळीत, नेत्रदीपक यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उत्तरोत्तर असेच यश तिला मिळो अशा शुभेच्छा.