हापूस आंब्याचा साखरांबा

  • २ हापूस आंबे
  • पाव किलो साखर
  • ५-६ वेलदोडे (इलायची)
१५ मिनिटे
१०-१५ वेळा

हापूस आंब्याच्या साल काढून लहान-लहान फ़ोडी कराव्यात.

साखरेचा कच्चा पाक करावा. (जास्त कडक पाक नको.)

पाकात फ़ोडी घालून, पाक घट्ट होइपर्यंत हलवावे.

नंतर वेलदोड्याची पूड करुन त्यात घालावी.

गार झाल्यावर काचेच्या बातलीत भरावा. 

गरम गरम पोळी आणि तूपाबरोबर खूप छान लागतो.

आणि बरेच दिवस टिकतो.

 

आई