तुझे जाणे....

आजही आठवले,
ते तुझे कसमसुन भेटणे,
जणु कधी भेटलोच नाही..
मग थोडे उन,
थोडा पाउस..
ती थेंब थेंब पाण्यावरची गाणी..
पण शेवटल्या वळणावर अशी काही वळलीस
जणु कधी काही घडलेच नाही..
अजुनही अडकली आहे ती कागदाची होडी
काय करणार ती तरी,
हल्ली पाउसही पडत नाही..