हळव्या कळ्या

नाती जपत असतांना मोजलेले


काही आठवणींचे झुले


त्यात थोड्या हळव्या कळ्या


आणि काही दुखरी फ़ुले


नाती संपत असतांना जमलेले


काही हसरे क्षण गहिरे


त्यातही थोड्या हळव्या कळ्या


काही दुखरी फ़ुले