नभाळल्या धुंद सरी

नभाळल्या धुंद सरी
तिथे किती सांज व्याली
शिडे नौकांची डोलती
नृत्य वृक्षांचे लाघवी

प्रफुल्लित थेंब गाती
जीवनाचे गीत न्हाती
भूवरी मोती सांडती
उचंबळ क्षणोक्षणी


प्रिये मजसी सांग ती
असे स्वये मी सोबती
पुलकित आसमंती
खिन्नता असे कोणती?