पाहील मी तीला अगदी जवळुन
आणी प्रेमात पडलो अगदी सावरुन
सावरुन म्हणतोय ते काही खर नाही
तुम्हाला सांगतोय पण बरोबर नाही
बरोबर अगदी बरोबर ओळखलत
मी हा तो आणी तो सुध्दा पडतोनं
प्रेमात अगदी तसाच पडलो
सगळे सापडतात तसाच सापडलो
माणुस ऐकदा प्रेमात पडला की धुंद होतो
नशा न करता ही बेबंद होतो
<!--break-->
मी बर्याच लोकाना पाहीलय ते म्हणतात
प्रेम-बीम सब झुठ है
ते लोक सुध्दा खोटच बोलत असतील
मनातील खरे पणाला झाकत असतील
त्याचं काही खर वाटत नाही
त्यानी सांगीतलेल पटतच नाही
पण खर सागंतो या पडण्यातील मजाच काही और असते
मला नाही वाटत यात काही गैर असते
कारण असा पडणारा प्रत्येक जणच असतो
कोणी लग्ना आधि तर कोणी लग्ना नंतर असतो