निळे निळे अस्मान
निळे निळे अस्मान
नदीत उतरलेले
रातराणीचे झाड माझे
अवचित बहरलेले
वाऱ्याच्या बेधुंद शिळांनी
सुरुबन अवघे भारलेले
चंदेरी-रुपेरी चांदणे
आसमंतात विरलेले
उभारुन गुढरम्य पारंब्या
झाड वडाचे सजलेले
कानाकोपऱ्यांतुन घराच्या
काळोखच थिजलेले
स्पर्शात तुझिया माझे
स्वप्न चिंब भिजलेले
निळे निळे अस्मान
नदीत उतरलेले!
-मुक्ता