रंगबिरंगी स्वप्नं पापणीत जपून
जेव्हा पाहिलंस तू.... नजर रोखून
तेव्हा जाणवलं... तुझी झेप क्षितिजाकडे
अन आता तुला भूमीचे वावडे
कदाचित येईलही तुझ्या मुठीत चांदणे
अन सुखसौंदर्याच्या ऐश्वर्यात नांदणे
पण अंती असेल सारे क्षणिकच...
'क्षितिज कवेत घेऊ शकत नाही'
हे जेव्हा तुला जाणवेल
तेव्हा ह्या भूमीशीच पुन्हा
नातं जोडावं लागेलं !