मला वाटत......
आज पुन्हा आपण ......
त्या चान्दण्या रात्री एकत्र बसाव,
पुन्हा माझ्या डोळ्यात जमतील अश्रु
पुन्हा ते तु तुझ्या पदरान पुसाव.
अगदी तु होतीस
म्हणुन जीवनाला माझ्या अर्थ होता,
उद्या तुला भेटायचे आहे,
म्हणून श्वासान्चा माझ्या
जगण्याचा तो प्रयत्न होता.
रागावलीस तु माझ्यावर आजही
तरी तुझ्या समोर उभा राहतो आहे,
जरी माझा तुझ्यावर हक्क नसला
तरी तुला मी माझे जीवन मागतो आहे.
सुहास.