"माझ्या मनतले"

मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ,


ह्रदयाचा माझ्या केलास तु विनाकारणच खेळ.


मी म्हणालो नाही म्हणून काय ?


तूही म्हणायचं नव्हतसं.


 


चुकलेल्याला वाट,


तहानलेल्यांना विहीर,


आणि माझ्यासारख्यांना प्रेमाचा घाट,


का... तुला दाखवायचाचं नव्हतं.


 


मला वाटलं तू समझशील,


अनं.... तु माझा तू स्वीकार करशील.


नाही मजला तुझ्यापासून कोणतीचं आशा,


फ़क्त तुच आहेस माझ्या जीवनाची दिशा.


 


माझं मन झालय व्याकूळ फ़क्त तुझ्यासाठी,


करु नकोस दिशा भूल या ह्रदयाची.


मनातं आहे फ़क्त खंत तुझ्याच प्रेमाची,


देईन तुला मी साथ "सात जन्मांची".


                                "महेश भोसले"