प्राजक्तफ़ूले..

माझी ही इथे प्रस्तुत होणारी पहिली कविता..


 


क्षितिजावर रोज उमलायची


चांदण्यांची प्राजक्तफ़ूले..


किती हरखायचो आपण


वेचताना प्राजक्तफ़ूले..


ऊर भरून श्वास घेत


हुंगायचो प्राजक्तफ़ूले..


ओंजळ भरभरून एकमेकांवर


उधळायचो प्राजक्तफ़ूले..


आता हरवलेत ते हात


वेचणारे प्राजक्तफ़ूले..


अजूनही पण, रोज मुक्याने


सांडतात प्राजक्तफ़ूले..


 


-सुप्रिया