शस्त्रगीत

परिचय- शस्त्रनिर्बंध रद्द करण्याची मागणी करण्यासाथी प्य्ण्यास विद्यार्थ्यानी मोथी मिरवणूक काढली तेव्हा त्यांच्यासाठी हे पद रचले


 


व्याघ्र-नर्क-सिंह-सर्प-हिंस्त्र-जीव-संगरी


शस्त्रसंगतीने मनुष्य हा जगे धरेवरी


रामचन्द्र चापपाणि अह्क्रपाणि श्रीहरी


आर्त्ररक्षणार्थ घेती शस्त्र देवही करी


शस्त्र पाप ना स्वयेचि शस्त्र पुण्य ना स्वये


इष्टता अनुष्टताहि त्यास हेतुनेच ये


राष्ट्ररक्षणार्थ शस्त्र धर्म्य मानिते जरी


आंग्ल,जर्मनी जपान राष्ट्र राष्ट्र भूवरी


भारतातची स्वदेशरक्षणार्थ कां तरी


शस्त्र-धारणी बळेचि बंध कां अम्हावरि?


शस्त्र बंधने करा समस्त नष्ट या क्षणा


शस्त्र-सिद्ध व्हा झणी समर्थ आर्त रक्षणा


व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना


नव्या पिढीस द्या त्वरे समग्र युद्धशिक्षणा!


स्त्रोत-- समग्र सा.<काव्य्विभाग<१९३८


 


सदर काव्य वाचल्यानंतर व्वा असे सहजोद्गार येतात.काही ठिकाणी तर प्रतिभेची उंच भरारी लक्षात येते.


'राष्ट्ररक्षणार्थ शस्त्र धर्म्य मानिते जरी


आंग्ल,जर्मनी जपान राष्ट्र राष्ट्र्भूवरी


भारतातची स्वदेशरक्षणार्थ कां तरी


शस्त्र-धारणी बळेचि बंध कां अम्हावरि?' या ओळी वाचताना


आंग्ल,जर्मनी जपान याचा सुयोग्य वापर केला गेला आहे.याची सुखद जाणीव होते.


'नव्या पिढीस द्या त्वरे समग्र युद्धशिक्षणा!' या त्यांच्या विचाराला व हजारो तरुणाना प्रोत्साहित करून सैनिकी शिक्षण देवविले,ते ही ब्रिटिशांकरवी, ही या देशाला या सुपुत्राने दिलेली अलौकिक भेट आहे.


'व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना'या ओळी म्हणजे तर या सुपुत्राने स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वातंत्र्याच्या झंजुमंजु होण्या च्या वेळी, म्हणजे सुयोग्य वेळी, येणाऱ्या शासनव्यवस्थेचा विचार चालविला होता हे स्पष्ट होते. हा दूरदर्शीपणा त्यानी दाखवला व त्यासाठी 'रिक्रूटवीर' 'ब्रिटिशांचे एजंट' वगैरे अवहेलना झेलली,ती ही हसत हसत. त्यासाठी तरी समस्त भारतवासीयानी भगवे दंडवत(लाल सलाम च्या धर्तीवर) केले पाहिजे.प्रथम मी करतो.


धन्य ते सावरकर!