जा झुंज !

रत्नागिरी च्या तरुण हिंदु मंडळ ह्या क्रांतिप्रवण संस्थेसाठी हे पद रचले.


निजजाति छळाने ऱ्हिदय कां न तळमळते ?


तुम्ही तरुण शिरांतुनि रक्त नवे सळसळते


हे नवे रक्त तो विजेहुनी पेटावे


मृत्युसि तुम्ही गाठुनि गळे भेटावें


मग मुकुट आपुला कोणी! फ़ोडिला


हिंदुंचा झेंडा कोणी! मोडिला


हे चिंतुनि चिंतुनि कृद्ध आसवे जळती


दिनरात्री डोळ्यांतूनिम कां न रे गळती ?


या भारतभूस्तव समररंगणी गेले


या चिंतेने बहु वीर लढुनिया मेले


कुणी घोर यातनांचिया चितेवर जळले


कुणी फ़ांस गळ्यासी लागताहि न ढळले


त्या त्यांच्या अपुऱ्या इच्छा! या क्षणी


तुम्हासि बाहती हाका !फ़ोडुनि


कां ऐकू येती कोणा ! यांतुनी


जरि येती तरी रे ऊठ कोण जो  तो तू


घे करि शिरा जा झंज पुरव तो हेतू


*****************************


स्त्रोत<समग्र सावरकर<काव्य विभाग< १९२६