तारकांस पाहून -१

सुनील नभ हे, सुंदर नभ हे,नभ हे अतल पहा


सुनील सागर, सुंदर सागर,सागर अतल पहा 


नक्षत्रांहिं तारांकित हे नभ चमचम भासे


प्रतिबिंबाही तसा सागरहि तारांकित भासे


नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होई


नभात जल ते जलात नभ ते संगमुनि जाई


खरा कोणता सागर यांतुनि वरती की खाली


खरे तसे आकाश कोणते, गुंग मति होई


आकाशीचे तारे सागरि प्रतिबिंबित होती


किंवा आकाशी हे बिंबति सागरिचे मोती


किंवा आकाशचि  हे सगळे, की, सागर सगळा 


भवसागर बोलती पुराणी प्रथित ऋषि त्याला.......१


स्त्रोत<समग्र सावरकर<कव्य विभाग


 


 


(अशा ५ चरणात असल्याने क्रमशः बरं कां मंडळी!


रोज काही ना काही तरी सावरकर साहित्य टाकायचा उपक्रम हाती घेतल्यापासून रोज जमेल तसे व म्हणून इतकेच. दीर्घ काव्य एकटाकी व एकटा ही लिहणे आवाक्याबाहेर आहे म्हणुन हाती घेत नाही. पुन्हा टंक्लेखन चुका उचलून धरल्या जातात चु हु मं च्या सभासदाकडून तो वेगळाच आहेर. असो.