झेंडावंदन झाले, वन्दे मातरम झाले
आमचे देशप्रेम भरून आले
जिलबी झाली, दुपारची झोप झाली
आमची कुर्बानी पूर्ण झाली
झब्बा घातला, घातली कोल्हापूरी चप्पल
पण आमची जीन्स होती स्टाईल सिंबल
संध्याकाळी पिक्चर अन बाहेर डिनर
स्वातंत्राची आम्हाला केवढी ही कदर
दुसरया दिवशी सकाळी, पुन्हा तिच लाचारी
सहज दुर्लक्षितो आजूबाजूची बेकारी
गांधी मोठे, त्यांचे विचार थोर
पण प्रत्येकात दिसतो आम्हाला एक चोर
नितीमत्ता भोळेपण, लबाडी हीच हुशारी
वेशीवर टांगली आहेत मुल्ये बिचारी
I See,You Know भाषेत सुदधा नाही आम्ही स्वाभिमानी
ज्यांनी लुटले त्यांची तत्वे पाळतो अजुन ईमानी
जखमेवर तेल मागताहेत ते अश्वथामे
चला स्वातंत्र्यदिनी आठवू त्यांचे कारनामे