प्रतिक्षा

पिंपळ पारावरचा
कधीपासुन वाट पाहतोय.. कुणाची?
कितीतरी वर्ष गेली होऊन
अजुनही नाही थकला तीथे उभा राहुन


किती पिढ्या कावळ्यांच्या
गेल्या त्याला साथ देऊन
किती ऋतुचक्र गेली
निघुन या पारावरुन


अजुन नाही वाकलाय
तरी आता वाटलं.... थकलाय.....
संपली सारी पानं
साथीला कावळाही न उरलाय


मगाशीच वठलेल्या पिंपळाला
पालवी पाहीली फुटलेली
अन कळलं मला
त्याची प्रतिक्षा नाही अजुन संपलेली.....
नाही अजुन संपलेली.....