पाऊसवेळा

पाऊसवेळा..


तसा नेहमीच तो


अवचित उतरतो


अंतर्बाह्य चिंबचिंब भिजवतो..


जीव कातरतो माझा


त्याच्या आवेगपूर्ण मिठीत


तो मात्र, भलताच असतो खुशीत..


जिथं तिथं दरवळतो


त्याचा मंद मंद सुवास


ऊर भरून घेताना दुणावतोच मग श्वास..


असा कित्येकदा तो माझ्यावर


अनावर,मुसळधार कोसळतो


हसता हसताही मग मिठीत येऊन रडतो..


-सुप्रिया