आई

गार वाऱ्याची झुळूक आली,


प्रत्येकालाच स्पर्श करून गेली


कोणताच दिवा न्हवता अंधारात


आणि एकटीच बसले होते मी घरात


वाटत होते उदास उदास,


मी बसले होते तशीच काही तास


आसपासच्या अंधाराचे मला न्हवते भान,


जणू आयुष्याताच पसरले होते अंधाराचे रान


गार वाऱ्याने मला प्रेमाने कुरवाळले,


तेव्हा वाटले आईशिवाय मी नाहीच रूळले


समोर दिसत होती मला माझी आई,


तिची उणीव भासत होती असुनही दादा ताई


आता वाटतय आपण आईला केवढा त्रास दिला,


आईची किंमत कळली आता मला!