अव्यक्त

कसे बहरले प्रेम कोवळे
कशी अचानक जडली प्रीती
कसे उमलले भावफ़ुल हे
अशा अचानक बसल्या गाठी...


रोज तुला मी पाहत होते
मनात कधी ना येई भलते
जादुगीरी ही कशी जाहली
नाही कळले तुला मला ते...


हे नाते रे जरी अनामीक
जरी उमलले नाही ओठी
अव्यक्तच ही राहो जगती
तुझी नि माझी अबोध प्रीती...