तो दिवस मी विसरु कसा....॥
एकदा ती दिसली....
ह्रदयातच जाऊन बसली..
कधी स्वप्नात तर कधी
मनात येवून छळू लागली..
तो दिवस मी विसरु कसा....॥
मग इंद्रधनुष्य रोज दिसू लागले..
सर्व झाडे,हिरवळ-सगळे बहरले..
मेघ आनंदाने रोज बरसले..
आणि काही मित्र..मात्र दूरावले..
तो दिवस मी विसरु कसा....॥
ना अभ्यासत ना खेळण्यात मन रमायचे
आपण-आपण एकटेच दिवसभर घुटमळायचे
उगाच कोणावरही त्रागा काढायचे
मन असे नेहमीच काबूतून सुटायचे...
तो दिवस मी विसरु कसा....॥
आधी दहा मग पाच आता दोनच मित्रांवर आलो..
तरीदेखील तिच्याच विचारात गुंतून राहिलो..
परिक्षा दोन दिवसांवर असतांना एकटाच खोलीत बसलो..
आणि पाहतो तर काय? अभ्यासात पुरताच खचलो..
तो दिवस मी विसरु कसा....॥
निकालानंतर फक्त ओरडतोच आहे...
विना मित्रांचा हंबरडतो आहे...
तो दिवस मी विसरु कसा....॥
पण एक आनंदची बातमी सांगू.......
ती मला एकदा भेटली आणि माझीच झाली..
माझ्या आयुष्यात एकदमच दिवाळी आली..
आता नव्या उमेदीनं अभ्यास करीन....
गमावलेले मित्र पुन्हा मिळवीन....
आणि खऱ्या प्रेमाची ताकद
या साऱ्या दुनियेला दाखविन....
तो दिवस मी विसरु कसा....॥
तो दिवस मी विसरु कसा....॥