काही असं काही तसं...

काही प्रश्न पोटाचे काही तत्वाचे असतात
काही रस्ते सरळ काही वळणाचे असतात


काही मित्र क्षणभर काही कायमचे रुसतात
काही वण चेहऱ्यावर काही मनावर उमटतात


काही नाती रक्ताची काही वेदनांची असतात
काही अश्रु ढाळायचे काही गिळायचे असतात


काही गुन्हे माफीचे काही फाशीचे असतात
काही दिवस आपले काही कलीचे असतात


काही नाती कागदावर काही हृदयातुन तुटतात
काही सुर आळवायचे काही गाळायचे असतात