आभाळाशी माझे नाते जोडावेसे वाट्ते
पायातल्या या श्रूंखलांना तोडावेसे वाटते,
माझ्या मनाला तुझ्या मनाशी बोलावेसे वाटते
तुझ्या सोबतीने पाऊलांना चालावेसे वाटते.
तु दुर अशी का? तुला,मला भेटावेसे वाटते
नजरेत तुझ्या, मला अता हरवावेसे वाटते,
मी रिता,मन रिते नजरेत तुला भरावेसे वाटते
आताशा तुझ्यात मला उरावेसे वाटते.
जयेन्द्र .