किनाऱ्यावर बसून कल्पनाच करायच्या
तू किती दूरवर आणि कुठे कुठे पसरलेला असशील......?
लडिवाळ लाटांमध्ये
कधी भिजायचं कधी कोरडं राहायचं
उधाणुन आलास की.......
कवेत घ्यायचं...
गेलास की सोडून द्यायचं
डोळ्यात आठवणींना घेऊन बसायचं
खाऱ्याच त्याही तुझ्यासारख्या.....
किनारा सोडताना स्वच्छ हात पाय धुवावे आणि परतावं म्हणल तर.....
जाणवतं थोडी वाळू चिकटलीये
तळव्याला.........