काहीतरी असावं..

तुझ्या माझ्या मधे काहीतरी असावं


तुझ्या माझ्या सवे काहीतरी असावं,


असावं असं काही ज्यानं ओढ लागावी


ओळख असुन येवढं तरी अनोळखी नसावं.


     उगाच गुंतुन राहणं तुझ्यात माझे नसते


     मी मनापासुन तुझ्या मनात असावं,


     असेल ही मी वेडा कदाचित जरासा


     माझ्या सावलीत मला का? तु भासवं.


        म्हणुन तुझ्या माझ्या मधे काहीतरी असावं


        खरंच असावं काहीतरी नाहीतर काहीच नसावं.