अंतर

शब्दांनी शब्द वाढत जातो म्हणतात...
पण आपण तर नि:शब्द होतो
तरीही हे अंतर वाढतच गेलं,
कदाचित शब्दांनी भांडण्याइतकं आपलेपणही
आपल्यात राहिलं नव्हतं.