तुझ्या येण्याने अन जाण्याने लहर मनामधे उठते
सांगु कसे तुझ मी प्रिये तु कुठे-कुठे दिसते,
डोळ्यात तुच असते माझ्या मनात तुच असते
येणार्या अन जाणार्या या क्षणात तुच असते.
सांगु कसे? तुझ मी प्रिये तु कुठे-कुठे दिसते....
मी तुझला या सहण्याच्या छंदात तुच असते
नाजुकश्या या नात्याच्या बंधात तुच असते,
गवताच्या त्या पात्यावरल्या थेंबात तुच असते
या गीताच्या शब्दांच्या,सुरात तुच असते.
सांगु कसे? तुझ मी प्रिये तु कुठे-कुठे दिसते....
(जयेंद्र)