माझ्या पाऊलांना आताशा चालता येत नाही
माझ्या शब्दांना तुझ्याशी
आताशा बोलता येत नाही,
दु:ख होतं तुझ्या विरहाचं मनाला माझ्या
मझ्या वेदनांना अताशा मला छळता येत नाही.
तुच दिलेस भरभरुन एवढं सुख मला
आता शब्दात ही मला सांगता येत नाही,
तुझ्याच विचारांचे वादळ असते ह्र्दयात
स्वप्नांना माझ्या मला बांधता येत नाही.
( जयेंन्द्र)