पुनर्भेट


खूप दिवसांनी पुन्हा मी


तुला भेटायला येईन तेंव्हा,


जुन्या आठवणी मनात घेऊन


तू मला शोधत असशील.




भिरभिरणारी नजर तुझी


माझ्यावर विसावेल तेंव्हा,


मी तुला शोधत असताना


तू लपून हसत असशील.


मग माझ्या मागून येऊन


तू माझे डोळे  अलगद मिटशील,


त्या मिटलेल्या डोळ्यांमधूनही


तू मला दिसशील :-) .




इतक्या दिवसांनी तुला पाहून


माझी बडबड सुरू होईल...


मी बोलत असताना,


तू अबोल, एकटक माझ्याकडे पाहशील.


बोलताना माझी नजर


तुझ्या नजरेत अडकेल,


डोळ्यांसोबत माझे हातही


तू तुझ्या हातात घेशील...




धडधडत्या हृदयाची स्पंदने,


आणि मी थरथरत असेन तेंव्हा


विरहातील सारी स्वप्ने माझी


एका क्षणात पूर्ण होतील,


माझ्या डोळ्यांतील अश्रूंची फुले


तुझ्या तळहातावर विसावतील.


-अनामिका