चुकलेला एकताल

ह्या असह्य शहरात
माणसांची चाके झाली आहेत
त्यांना धावायला रस्ते लागतात
डांबरासारखेच तत्त्वज्ञान!
गल्लोगल्ली 'बाबा माता टायर मार्ट'


चिरपरिचित शहराचे अज्ञात कोपरे
एकत्र जोडलेले भयाने
बस नंबर ३२  स्वप्ना पासून लाचारी पर्यंत
केवळ पाच थांब्यात


ह्या शहरात कान देऊन ऐकाल तर
कळेल घराघरातून नाचतायत 
कातडीवर बोटे
एकतालाच्या पळवाटेवरदेखील चुकलेली