असू दे समोर अठरा अक्षौहिणी सेना
एक कृष्ण
आपल्यामधे असला म्हणजे झाले.
असू दे समोर शंभर दु:ख,दैन्य,मृत्यु
एक बुद्ध
आपल्यामधे असला म्हणजे झाले.
असू दे समोर सूर्य न मावळणारी साम्राज्ये
एक गांधी
आपल्यामधे असला म्हणजे झाले.
काऱण शहाण्याच्या फौजा लढतात फक्त लढाया!
इतिहास घडविण्यासाठी
एक वेडा
आपल्यामधे असला म्हणजे झाले.
जयन्ता५२
(माझी ही कविता इतरत्र प्रकाशित झालेली आहे)