कृष्णास

समजावयाला गेला होतास ना?


इतक्या लवकर परतलास?


हरलास की जिंकलास विचारणार नाही


द्रौपदीच्या पुत्रांसारखी निद्राधीन नाही मी


केव्हाही अश्वत्थाम्याने येऊन शिरच्छेद करावा


कृष्णा आजचे महाभारत तुझ्याशिवाय लढतेय


स्वतःच सारथी होऊन


स्वतः चे सारथ्य करतेय


रणधुमाळीत धुमसतेय


कौरवांच्या नायनाटासाठी


मुक्ता