पु. ल. देशपांडे यांच्या असा मी असामी मध्ये नायकाची बायको लग्न झाल्यावर उखाणा घेते तो असा,समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता बेंबट्याच नाव घेते माझा नंबर पयला. यातील विनोद सोडून दिला तरी व्हिंदमातेचा नंबर मात्र पयला बऱ्याच क्षेत्रात येऊ लागलाय नुकतीच जी बातमी वाचली त्यानुसार परदेशात व्यापार आदि क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी लाच देण्यात भारतीय व्यापारी उद्योजक वगरेंचा अव्वल क्रमांक आहे. यापूर्वी उद्धटपणाबाबत मुंबई नगरी बाका तिचा जगामधे डंका अशी पण बातमी होती. ळवकरच लोकसंख्येतही आपला म्हणजे व्हिंदमातेचा पयला नंबर लागण्याची शक्यता आहे. या तिन्ही बाबतीत काही व्यक्तीनी उलट मतप्रतिपादन केले आहे.टाइम्स ऑफ इंडिया च्या मते लाचखोरी करणे भारताला भाग पडते कारण बऱ्याच क्षेत्रात बड्या राष्ट्रांची धोरणे ज्यामुळे भारतीय मालाच्या किंमती किंवा दर्जा स्पर्धेत टिकू शकत नाही म्हणजे या देशांची धोरणे याला कारणी भूत आहेत. ऊद्धटपणाविषयी मनोगतमध्येच चर्चा झाली होती आणि तीनुसार पहाणीचे निकषच बरोबर नव्हते̮. लोकसंख्येच्या बाबतीत स्वामिनाथन् (टाइम्स मध्येच स्वामिनोमिक्स लिहिणारा)या अर्थतज्ञाच्या मते लोकसंख्या हा भारताला फायदेशीर मुद्दा ठरणार आहे कारण इतरत्र वृद्ध माणसांची संख्या वाढून तरुण काम करणाऱ्या लोकांचा तुटवडा पडेल (यात चीनचाही समावेश होतो कारण चीनमध्येही एक कुटुंब एक मूल या धोरणामुळे वृद्धांचे तरुण माणसांशी असलेले प्रमाण वाढणार आहे.)त्यावेळी ही भारताचीच लोकसंख्या जगाचा कामाचा भार सांभाळायला उपयोगी पडणार आहे.त्यामुळे लालूप्रसाद आय आय एम यांचेही त्यांच्या लोकसंख्याविषयक धोरणाबद्दल त्यानी कौतुकच केले आहे. मनोगतीना काय वाटते ?